२५ डिसेम्बर २०१८ ला सुकन्यानी ( सुकन्या कुलकर्णी) तिचं खूप वर्ष जपलेलं अरंगेत्रम करण्याचं स्वप्न तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी पूर्ण केलं .
त्यानंतर मला माझ्या पन्नाशीला काय विशेष करता येईल याच्या विचारांचा भुंगा डोक्यात सुरु झाला.. काहीतरी स्वतःचा कस लावणारं , मनाजोगतं, साहसपूर्ण करण्यासाठी सध्या मस्त चालू असलेलं सायकलिंगच करावं असं मनाने घेतलं .
पण माझा वाढदिवस जून मध्ये , भर पावसाळ्यात सह्याद्रीत काही सोलो स्टंट करावे असं वाटेना मग कुठे जाता येईल तर थंड वाळवंटी प्रदेशातल्या जगातील सर्वात उंच रस्त्यावर सायकल चालवावी असा विचार मनात आला.
जानेवारी मध्ये जेंव्हा यावर विचार सुरु केला तेंव्हा घराचं अर्धवट झालेलं काम पूर्ण करायला घ्यायचं होतं . परत एकदा अज्ञातात बुडी मारायची होती , आशा ही की २ महिन्यात काम पूर्ण होईल , घरात राहून काम करून घेता घेता जिम आणि सायकलींगचा चा सराव करता येईल.
त्या आशेवर मी माझी फिटनेस आणि सायकलींगची तयारी सुरु केली , २६ जानेवारीला आमच्या दादरच्या सोसायटी च्या ५० वर्ष पूर्ती चा भरगच्च कार्यक्रम होता त्यात आम्ही माहेरवाशिणीनी एक नाच आणि माझा एक सोलो नाच करायचा ठरवलं होता , भाच्याचं डेस्टिनेशन वेडिंग फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात होतं त्यातही एक नाच आम्ही बसवत होतो आणि २२ जानेवारी ला माझ्या सेंटर च्या जवळ एका विचित्र प्रसंगात माझं उजवं पाऊल आणि नडगी जखमी झाली , वाटलं की झालं फ्रॅक्चर पण जेंव्हा सूज जास्त वाढली नाही आणि दुखणं लवकर आटोक्यात यायला लागलं तेंव्हा परत प्रॅक्टिस ला सुरुवात केली . पहिल्या ३ दिवसात एक आणि त्याच्या पुढच्या ३ दिवसात पुढचा असे सगळे नाच बसले, आणि दुखऱ्या पायानिशी मस्त पारही पडले.

फेब्रुवारी मध्ये माझे आणि नीलचे लेहचे तिकीट काढले.
चार महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१८ ला दुसऱ्या घरात शिफ्ट होऊन पाच महिने चाललेले काम घायकुतीला येऊन मी बंद केले होते आणि सगळे घरातले सामान परत घरात आणून टाकले होते.
आता इथेच राहून त्रास सहन करून काम करून घेऊ असे ठरवले. पण घेतले जाणारे अचाट निर्णय , आणि कामाचा वाढत आवाका यामुळे सुतारकामाने वेळेचा उच्चांक गाठला , इतर अनेक अडचणी येत गेल्या,
घरी धुळीचा इतका कडेलोट झाला कि मला जुजबी सामानानिशी दादर ला पळ काढावा लागला . मानसिक ताणाने परिसीमा गाठली , शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागल्या आणि कडी म्हणजे अपेक्षित अश्या सरावाला विराम मिळाला. काही उपाय सुचेना सरावच होत नसेल तर लडाख ला जावंच कशाला हा विचार बळावू लागला.
शेवटी हिय्या करून सायकल मुंबईत आणली आणि पहाटे लवकर उठून दक्षिण मुंबईमध्ये सराव सुरु केला . इतकी वर्ष मुंबईत सायकल चालवायला मन धजत नव्हतं , ट्रॅफिक मध्ये नाही जमणार या भीतीपोटी . पण पहाटे दक्षिण मुंबई जामच भारी असते हे आता नव्याने कळले . आणि मग मात्र मी या राईडची मस्त मजा घ्यायला लागले. सायकल वरून फिरताना पूर्वी नजरेतून सुटलेली शहराची कितीतरी वैशिष्ट्य दिसू लागली आणि मग फेसबुक मित्र मंडळी ना माझ्या या हटके मुंबई दर्शनाच्या फोटो क्विझ ची मजा देऊ लागले .

जी पी ओ च्या समोरचा रस्त्यावरचा दिवा पेटवणारा माणसाचा पुतळा ,
हॉटेल ताज च्या बाजूची जुनी पण सुंदर बनवलेली इमारत , लहानपणी पाहिलेला म्हातारी चा बूट नव्या अवतारात सायकलच्या साथीने अनुभवणे ,
गडगंज श्रीमंतांच्या टोलेजंग इमारतींच्या धमन्यांतून घामटे काढत सायकल दामटणे ,
मुंबईच्या रेट्यात हरवून गेलेल्या बाणगंगे सारख्या जागा शोधणे अशी धमाल मजा मी साधून घेतली.

माझ उद्दिष्ट होतं लेह ते खारदुंग ला हा अति उंच हवामानाच्या चढावरचा ४० कि मी चा पूर्ण चढणीचा रस्ता एका दिवसात सायकलीने चढून जाणे .
त्यासाठी नुसते लांब पल्ले सायकलिंगपेक्षा चढाच्या रस्त्यांची सवय करण्याची आवश्यकता होती .
नुसते फ्लाय ओव्हर पुरेसे नव्हते मग पेडर रोड , अल्टा माउंट रोड मलबार हिल , वाळकेश्वर असे अवघडात अवघड चढ असलेले रस्ते शोधून काढून त्यावर फेऱ्या मारू लागले आणि सराव जसा जमेल तसा चालू ठेवला.
चढ आला कि माझ्या उजव्या गुडघ्यात किंचित कळ यायची मग परळला माझ्या गुडघ्याचे डॉक्टर , डॉ अनंत जोशी ना दाखवून यायचं ठरवलं , त्यांनी हिरवा कंदील दिला आणि खाली असलेल्या फिजिओ सेंटर मधून आखडलेला खांदा आणि गुडघे यांच्या साठी व्यायाम शिकून घ्यायला सांगितले. अद्ययावत अश्या जिम मध्ये थेरपिस्ट नी मला व्यायाम दाखवले .
आता हे करायचे कुठे , माझी जिम सीबीडी ला मी दादरला , शेवटी सायकलवर टांग मारून परळ गाठणे आणि डॉक्टरांच्या सेंटर मध्ये दर सेशन चे पैसे देऊन व्यायाम करणे असा मार्ग मी शोधला ,
वाढलेलं वजन कमी झालं तर मला निश्चितच फायदा झाला असता पण या दादर सीबीडी आणि एकूणच अव्यवस्थापनाने आहारावर अजिबात शिस्त लावता येईना.
एकीकडे घराचं काम मनासारखं वेळेवर होत नसल्याची निराशा आणि दुसरीकडे त्या निराशेवर मात करण्याची तडफड असे दिवस चालले होते . ज्या वस्तू , कपडे लडाख ला न्यायच्या त्या अजूनही धुळीच्या ढिगाऱ्यात पडून होत्या .कामगार मंडळी विशेषतः सुतार काम संपवत नाहीत तो पर्यंत इतर कामं पुढे सरकेनात.
मी दिलेली डेड लाईन कधीच सरली आणि सरते शेवटी साडेचार महिन्यांनी ७, ८ जून ला घर माझ्या ताब्यात आलं , त्यानंतर साफ सफाई करून सामान साधारणपणे लावण्यात ३ दिवस गेले. सीबीडी त असलेलं माझं थेरपी सेंटर सुरु केलं.
घर पूर्ण झाल्यावर लडाख ला जाण्याआधी एक गाण्याचा कार्यक्रम ठेवावा असा नीलचा धोशा चालू होता , त्याला थोपवून धरला होता कारण मनासारखं घर लागेपर्यंत आणि जाण्याच्या तयारीचा अंदाज येई पर्यंत काही खरं नव्हतं . शेवटी १६ तारखेला कार्यक्रम निश्चित केला, १८ ला नील चा वाढदिवस आणि १९ मध्यरात्री आमची फ्लाईट .
खरं म्हणजे लडाख ची तयारी , सराव राहिला बाजूला आणि या कार्यक्रमाच्या खान पान, बैठक , घरातील शेवटच्या लावायच्या राहिलेल्या वस्तू यातच १६ चा दिवस जायचा पण मी सीबीडी ला आल्या पासून नेटाने खारघर हिल वर सायकलिंग सुरु केले होते, हा चढ सलग ५ कि मी चा आहे , पहिल्या दिवशी १ लूप .दुसऱ्या दिवशी २ आणि १६ तारखेला पहाटे या रूट चे ३ लूप मी करून आले ,

आत्ता पर्यंत च्या सरावात सर्वात जास्त अंतर चढ मी चढले . हे अजिबात पुरेसं नाही कारण हिमालयात अति उंची मुळे प्राणवायू ची कमतरता जाणवणार असते , आणि खारडुंग ला चा चढ ४० किमी होता , कशी करणार होते मी उद्दिष्ट पूर्ण?
१७ , १८, १९ एक हि दिवस सराव होऊ शकला नाही.
त्यातल्या त्यात मनाला आनंद देणाऱ्या काही गोष्टी म्हणजे घर सुंदर दिसायला लागलं होतं .

१६ तारखेचा गाण्याचा कार्यक्रम उत्तम झाला.
१७ तारखेला ताई नी नीलच्या पसंतीच्या बी के सी मधल्या हॉटेल मध्ये त्याला पार्टी दिली , रुचिरा नी बनवलेला अभिनव केक सरप्राईज आयटम झाला . न्यूझीलंडला असल्यामुळे सर्वांसोबत साजरा न करता आलेला नीलचा वाढदिवस जंगी साजरा झाला. रात्री दादरलाच राहिलो.
१८ ला जेंव्हा सीबीडी ला घरी परतलो तेंव्हा कुठे सामानाची जुळवाजुळव सुरु केली . गरम कपडे , प्रवासाचे कपडे , सायकलिंग चे सामान आणि कपडे , पौष्टिक पदार्थ , पेय , ट्रेकिंग करता आले तर असावेत म्हणून ट्रेकिंग पोल अशी शेवट पर्यंत तयारी आटोपून १९ ला संध्याकाळी दादर ला आलो .
ताईच्या दर वर्षीच्या भारत ट्रिप मध्ये या वर्षी ची ट्रिप आमच्या दोघींसाठी फारच ताण पूर्ण ठरली , सीबीडीतून अचानक दादरला राहायला आल्यावर सर्वांची तंत्र जमवून आणणे ,स्वयंपाकाला बाई नसल्यामुळे त्या जबाबदाऱ्या पार पडणे , माझ्या मानसिक ताणामुळे होणारी चिडचिड या सगळ्याने माझ्या आणि ताईच्या संवादाचा नुसता राडा झाला होता. मग १९ ला रात्री निवांत गप्पा मारून, मन शांत करून तिच्या हातचे चविष्ट जेवून आम्ही लेहला जायला निघालो.
हुश्श , विमान वेळेवर सुटलं. सूर्योदयाची दिशा डोक्यात ठेवून विमानाच्या डाव्या बाजूच्या सीट मिळवल्या होत्या. पहाटे ४.३० च फ्लाईट होतं तेंव्हा लेहला पोचताना सूर्योदय झालेला असणार आणि बर्फाच्छादित डोंगर जर पाहायचे असतील सूर्याची दिशा समोर असून चालणार नव्हतं . अपेक्षेप्रमाणे आधी हिरवे उंचवटे मग बर्फाच्या टोप्या , त्यानंतर पूर्ण बर्फाळलेले डोंगर आणि शेवटी मुरुमी रंगाच्या बोडक्या डोंगर रांगा अशी नजरेचे पारणे फेडणारी दृश्य बघत विमानाने एकदम एक पाचूचे बेट दाखवलं . त्यात उमटलेली एक लांब रेघ. धाव पट्टी ? हेच आहे का लेह? म्हणता म्हणता आम्ही पुढे गेलो आणि मोठा वळसा घालून त्या रेघेवर येऊन जमीनस्थित झालो.

लेह ११५०० फुटांवर आहे. समुद्रसपाटीपासून निघून आपण एकदम एवढ्या उंचीवर आलो कि शरीराला हवेच्या कमी दाबामुळे त्रास होऊ शकतो . इथे तुलनेने ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे सर्व डॉक्टर आणि ट्रेकर मंडळीनी डायमॉक्स च्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता तो आम्ही पाळलाही होता . लेहला पोचल्यावर पहिले दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्यायची होती , वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी. मुख्य शहरापासून दूर छूबी मध्ये आमचं हॉटेल होतं .
दुसऱ्या दिवशी थोडं चालत फिरून सायकलींगशी निगडित ,आणि इतर काही मंडळींची भेट घेतली , बाजाराची ओळख करून घेतली. दर महिन्यात १५ दिवस लडाख मध्ये येणाऱ्या एका मित्राची सायकल मिळवली आणि २२ तारखेला माझी पहिली शांतीस्तुपाची पहिली राईड केली.
छुबी पासून साधारण चार एक किलोमीटर अंतरावर असलेला शांती स्तूप पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे . पण मी खूप पहाटे पोचले असल्याने एक दोन मॉर्निंग वॉकर्स व्यतिरिक्त तिथे कोणी नव्हतं .
ती करताना लक्षात आलं दम विशेष लागत नाहीय पण या सायकल ची फ्रेम खूप मोठी आहे , सायकल वरून उतरताना पाय टेकायची पंचाईत होतेय. तेंव्हा मग भाड्याने सायकल घ्यायचं ठरवलं .
लेह मध्ये मला काही मराठी धाडसी उद्योजक मंडळी भेटली त्यातली एक तन्वी . सायकलिंग , ट्रेकिंग च्या निमित्ताने लेह च्या वाऱ्या करणारी तन्वी लेह च्या प्रेमात पडली . आयुष्यभर टिपिकल नोकरी करायची नाही हे पक्के ठरवलं होतं . विशिष्ट प्रकारच्या कॉफीज् बनवायची कला शिकून घेत तिने इथे चक्क मेटा कॅफे नावाचा एक कॅफे थाटला आणि आता वर्षभरातच त्यानी छान बाळसं ही धरलं आहे.
हिच्या कॅफेतून बाहेर पडताना एक वेगळंच संकट उभं राहिलं . माझ्या एका पावलानी अचानक एक पायरी उतरायला नकार दिला आणि अख्ख पाऊल मागच्या बाजूला मुडपलं. असह्य कळ गेली आणि पाऊल घोट्याजवळ समोरच्या बाजूनी सुजायला लागलं . आधीच फिटनेसच्या नावानी बोंब आणि त्यात हा उद्योग. त्यातल्यात्यात, आपल्याला चालायचे नाही सायकलिंग करायचे आहे त्यामुळे नाही काही त्रास होणार हे मनाला समजावलं आणि तिथून निघाले.
तर या तन्वी शी गप्पा मारून, रोव्हर्स डेन या बॅक पॅकर्स लॉज प्रकारच्या सेट अप चे मालक ग्रीष्मा आणि कौस्तुभ शी बोलून मी माझी सायकलिंग राईड ची शारीरिक , मानसिक तयारी केली , हि मंडळी बॅक अप वेहिकल नकोच म्हणत होती पण माझ्या दृष्टीने ते आवश्यक वाटत होतं , आणि घेतला तो निर्णय योग्यच ठरला .
ठरल्याप्रमाणे भाड्याची सायकल ताब्यात घेऊन आम्ही संध्याकाळी हॉटेलला परतलो .
आता आमच्याकडे दोन सायकली होत्या तेंव्हा दुसऱ्या दिवशीच्या राईडला नील पण येतो म्हणाला. एअरपोर्ट रस्त्यावरून पुढे स्पितुक गोम्पा आहे तिथपर्यंत जायचं ठरलं. सकाळी निघालो आणि लगेचच पावसाचे थेम्ब यायला लागले , सर गेल्यावर निघू म्हणून चहाची सोय कुठे होते ते शोधलं , मस्त पैकी गरमागरम चहा पिऊन उताराला लागलो .
लेह शहर म्हणजे उंच जाणारा झुला आहे वर पोचलं कि फक्त झुई करून खाली यायचं . थेट विमानतळ पार करून हॉल ऑफ फेम च्या पुढे गोम्पा येईपर्यंत हलके हलके उतरतच जायचं , अर्थात हा शेवटचा उतार खरंच आहे याची जाणीव मात्र परतीच्या प्रवासातच झाली.
तर असा हा मस्त घरंगळत जाणारा रस्ता स्पितुक च्या फाट्याला पोचला आणि आम्ही डावी घेतली तेवढयात रोरावल्यासारखा आवाज आला आणि आमच्या उजवीकडून डोक्यावरून एक भलंमोठं विमानच झेपावत आलं आणि डावीकडच्या धावपट्टीवर पायउतार झालं , अर्ध्या क्षणात घडलेल्या या दृष्यानी स्तंभित अचंबित होऊन नील आणि मी एकमेकांकडे बघून खिदळू लागलो. हि म्हणजे भन्नाटच जागा होती. इथे बसून लँड होणाऱ्या विमानाचे फोटो व्हिडीओ काढायचे असं तेंव्हाच मनात ठरवून ठेवलं.
आता पुढे थोडा चढ होता तो सावकाश चढत गोम्पाला पोचलो , वर चढून त्या वास्तूचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि परतीच्या मार्गाला लागलो. तर सायकल काही दामटली जाईना , आधी वाटलं चाकात हवा नाही की काय पण मग लक्षात आलं कि आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे नुसता भास होतोय कि रस्ता सपाट आहे , प्रत्यक्षात मात्र रस्ता अगदी सलगपणे चढत होता आणि डोळ्याला ते जाणवत नव्हतं.
मध्ये हॉल ऑफ फेम हे आर्मी नि सियाचेन वॉरियर्स वर बनवलेलं म्युझियम बघून शहराकडे कूच केलं .
शहराच्या कमानीपाशी तर चढणी चा उच्चांक होता ,
नीलला सराव नसल्याने त्याची दमछाक होत होती पण मी मात्र छानपैकी एक लय ठेऊन त्या चढणी चढून गेले. आजची फेरी १८ किलोमीटर ची झाली.
तिसरा दिवस खारदुंग ला चा रस्ता जोखण्याचा . नील आज बसनी अलची नावाच्या गावाला जाणार होता आणि मी खारदुंग ला चा रस्ता जितका जमेल तितका चढून अनुभवून येणार होते.
सुरुवातीलाच जो रस्ता घेतला तो वेगळा निघाला, मग मागे फिरून बरोबर रस्त्याला लागले. तर तिथे ही जो रस्ता मुख्य खारदुंग ला च्या रस्त्याला मिळतो तो फाटा न घेता पुढे गेले, छान थोडा चढणीचा वस्तीतून जाणारा रस्ता होता , कधी फुलं , कधी मांजरं बघत चालले होते , एकदम लक्षात आलं कि मोठा रस्ता तर आपल्या उजव्या डोंगरावरून खूप उंचीवरून पुढे चाललाय , डोक्याला फार त्रास करून न घेता पुढे जात राहिले. कोणाला विचारावं तर एक माणूस दिसेना. शेवटी भेटला एक जण . त्याला विचारलं कि बाबा हा रस्ता पुढे खारदुंग ला च्या रस्त्याला मिळेल का? तर हो म्हणाला उजवीकडे जाणारा एक मातीचा रस्ता दिसेल म्हणाला आणि खरंच ५ मिनिटात तो वरचा रस्ता माझ्या पातळीपर्यंत आला होता आणि समतल ठिकाणी मी कच्च्या रस्त्यानी खारदुंग ला च्या रस्त्याला लागले.
अनपेक्षितपणे मी अतिशय मस्त वरची वरची मजल घेत होते, वाटेत दिसणाऱ्या अनेक गोष्टी कॅमेऱ्यात टिपत होते.
अरे हो हे सांगायचं विसरलेच.
माझ्या सायकलला मी हॅन्डल बार पाउच लावून घेतला होता त्यात मी माझा कॅनन sx ५० कॅमेरा घेऊन फिरत होते. अनेक विध वळणांनी डोंगररांगांच्या फॉर्मेशन नी भारावून जात जमेल तेंव्हा फोटो काढत होते.
रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी पिवळ्या खाकी रंगाच्या मातीची सपाट जागा पार्किंग साठी ठेवली होती , त्यावर माझी काळी सायकल अगदी ऐटबाज दिसत होती . एका छोट्या दगडाला पॅडल टेकवून सायकल मस्त सरळ उभी केली आणि तिचे स्मार्ट फोटो काढले. हा रस्ता असंख्य बायकर्सच्या विश लिस्ट मधला असल्याने पदोपदी त्यांच्या झुंडी ची गाठ पडत होती . कधी १०, १५ कधी ५ ,६ तर कधी १, २ जण भेटत होते पुढे जात जात मला चियर करण्यासाठी अंगठा उंचावत होते.
तर मी आत्ता अशी सायकल, बॅकग्राऊंड आणि सीन च्या प्रेमात असताना सुपर बाईक घेऊन ३ बाईक त्यात पट्ट्यावर येऊन थांबल्या , त्यातल्या दोघी बायका होत्या. माझ्या सुरेख दृश्यावर विरजण पडलं असं वाटत असतानाच मंडळी पुढे निघाली. छान वळणावरून दिसेनाशी झाली . मीही त्यांच्या ट्रेल चा फायदा घेत एक मस्त फोटो सायकल सोबत कंपोज केला.
स्त्रावा माझं सायकलिंग ऍप पाहिलं तर १० किमी झाले होते मग अजून थोडी वर गेले ,
वाटेत यूरेशिअन मॅगपाय , रेड बील चफ हे तिथले नेहमीचे पक्षी दर्शन देत होते .
एका वळणापाशी थांबले असता मला एका अतिशय मजेदार अश्या घळीची गंमत कळली .
खारदुंग ला चा रस्ता या घळीला मध्यभागी ठेऊन वेटोळे घालीत वर चढत होता त्यामुळे वेगात जाणाऱ्या पांढऱ्या गाड्या पांढरे उंदीर बनून उजव्या डाव्या बिळात शिरत असल्याचा भास होत होता. बरं गाड्या जात नसतील तेंव्हा गगनापर्यंत पोचलेलली ती वैरण डोंगरघळ रस्ता पोटात घेऊन एकजीव होऊन जात होती. या सर्व दळण वळणाचा एक मस्त व्हिडीओ माझ्या कॅमऱ्यात मला काढता आला.
साधारण १ १ किमी गेल्यावर मी परत जायचं ठरवलं , एक तर याच रस्त्यावरून परत परवा जायचं होत तेंव्हा सगळा परिसर आधीच ओळखीचा असण्याची गरज नव्हती आणि माझं पाणी पण संपत आलं होत.
आज सकाळपासून ढगाळ हवा होती त्यामुळे हवेत चांगली थंडी होती फक्त मी चढावर सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या शरीरात चांगली उब होती. जशी मी सायकल परतीच्या दिशेने दामटली त्याबरोबर गारव्याने चावे घ्यायला सुरुवात केली, गळ्याभोवती घातलेलं बफ हि काही फार उपयोगी पडत नव्हतं आणि मग तशी च थंड हवेचे झोत अंगावर झेलत , रस्त्याच्या वळणावरून झुलत ११ किमी च अंतर पार करून हॉटेलात परतले. अक्षरशः हुडहुडी भरली होती . शेवटी हॉटेल स्टाफ ला गरम पाण्याचा जग मागितला आणि पांघरुणात तो घेऊन जरा वेळ शरीराला उब आणली.
आंघोळ करून ताणून देऊन आराम केला . संध्याकाळी लेह मार्केट मध्ये निरुद्देश भटकले , आत्ता पर्यंत मी आणि नील नी जुन्या लेह मधल्या छोट्या गल्ल्या भटकून झाल्या होत्या. सेंट्रल आशियाई म्युझियम बघितले त्याच्या बाजूच्या अतिशय रम्य अश्या कॅफे मध्ये बसून पहिला गुरगुर चहा प्यायला ( याक बटर चहा) ज्याच्या रंगाच्या आणि स्वादाच्या मी तर प्रेमातच पडले .
आज एका छोट्या हॉटेलात बसून मी बटर रोटी आणि चहा मटकावला .
रात्री शांत झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परत स्पितुक गोम्पाकडे जायचा बेत केला होता, तिथे जाऊन विमानाची फोटोग्राफी आणि मग एअरपोर्ट ला जाऊन एका मित्राला रिसिव्ह करायचं असा नेटका प्लॅन डोक्यात होता. पहाटे वेळेवर उठले. सगळं जामानिमा करून तयार झाले , हॉटेल बाहेर येऊन बघते तर काय संथ लयीत पाऊस पडत होता. आणि तो आत्ता नसून रात्र भर पडत होता हे ही समजलं . पूर्ण आकाश ढगांनी आच्छादलेले होतं . अश्या पावसात भिजत सायकल दामटण्याची काहीच शक्यता नव्हती . हरी हरी करत खोलीत बसून राहिले.
तिकडे नील ची शेवटची खबर रात्री मिळाली होती कि त्याला छान खोली मिळाली आणि त्याचा तो आज दुपार पर्यंत भटकंती, अल्ची किचन चे जेवण करून संध्याकाळ पर्यंत परत येणार होता. विमानानी येणाऱ्या मित्राची चौकशी केली तर आज सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या होत्या त्यामुळे त्याला भेटण्याचाही काही योग नव्हता. अख्खा दिवस पुस्तक वाच , नेट बघ , फोटो एडिट कर, कधी झोप असा घालवला.
दुपारनंतर सायकल च्या दुकानात जाऊन अली ला सायकल दाखवून एकदा चाचपणी करून घेतली , सोबत न्यायला एक ट्यूब पंप आणि पंक्चर किट घेतलं आणि परत हॉटेल वर आले.
दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता आणि खारदुंग ला सर करण्याचा दिवस होता आणि आजचा दिवस असा आळसात चालला होता. थोडं नैराश्य येत होत. संध्याकाळी नील आला मस्त गरमागरम कुलचा घेऊन. त्याच्या सगळ्या कथा ऐकत गरम चहा बरोबर कुल्चा खाऊन नैराश्य पळवून लावले. नीलला उद्या घ्यायच्या सामानाची लिस्ट दिली . सपोर्ट वेहिकल म्हणून टॅक्सी बुक केली . अंडा बुर्जी खाऊन दोघे वेळेवर झोपून गेलो.
पहाटे सगळी तयारी करून मी पुढे निघाले. नील टॅक्सी आल्यावर मागून येणार होता. पावसानी काल दुपारनंतर विश्रांती घेतली होती आणि आत्ता हि काही चिन्ह वाटत नव्हती.
सकाळच्या कुरकुरीत गार हवेत साधारण ५.४० वाजता मी चढाई ला सुरुवात केली. परवापेक्षा आज उगीचच जडत्व आल्यासारखं वाटत होतं . मग नजरआजूबाजूच्या परिसराकडे वळवून मन रमवू लागले. योग्य फाटा पकडून खारदुंग ला च्या रस्त्याला लागले आणि सावकाश १/२, १/१ गियर टाकून रास्ता कापत होते. साधारण ७ , ८ किमी झाले आणि नील ची गाडी माझ्या पर्यंत आली .
तेवढ्यात एक लहान आकाराचा शिकारी पक्षी समोरच्या एका दगडावर बसलेला दिसला आणि नीलला सांभाळायला दिलेला कॅमेरा परत माझ्या ताब्यात घेतला.
कॉमन केस्ट्रेल असा राईड च्या ब्रेक मध्ये टिपता आला. पण फक्त तोच नाही तर अजून ही काही गमती आणि पहिल्यांदाच पाहिलेले २ पक्षी कॅमेऱ्यात टिपता आले.
एका ब्रेक मध्ये दम खाता खाता समोरच्या डोंगराच्या कडे कडे लक्ष गेलं तर एकुलतं एक भराल ( ब्लू शिप ) मलाच पोझ द्यायला उभं असल्यासारखं दगडावर उभं होतं , ताबडतोब त्याचे फोटो काढले आणि पुढे निघाले

तर पुढच्या ब्रेक ला डावीकडच्या डोंगरावरून २.३ पक्षी उडालेले दिसले म्हटलं पार्टरीज दिसतायत. नजरेनेच त्यांचा मागोवा घेत राहिले तर माझ्या नशिबाने ते पल्याडच्या एका झुडुपाच्या बुंध्याजवळ उतरले , लगेच कॅमेरा सरसावून त्यांना शोधून काढलं आणि कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. ते होते मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले चुकर पार्टरीज .
प्रत्येक ब्रेक मध्ये मी थोडं पाणी कधी थोडं टॅंग , काही खाऊ जस ड्राय फ्रुट चा लाडू , चिक्की , केळे , चॉकलेट खात होते. अतिशय सलग असं माझा स्पीड होता. करता करता २० कि मी चा पल्ला मी गाठला.
तेवढ्यात लक्षात आलं बारीक बारीक बर्फुलांचा चा वर्षाव होतोय. आपण बर्फ वर्षावात सायकल चालवतोय या कल्पनेनंच मी एकदम हरखले.
आणि साऊथ पुल्लू जवळ पोचले.
तिथेच एका बायकर ग्रुपला माझं कौतुक वाटलं म्हणून माझ्या बरोबर एक ग्रुप फोटो त्यांनी तिथे काढून घेतला.
साऊथ पुल्लू हि खारदुंग ला रोड वरची आर्मी पोस्ट आहे जिथून चेकिंग केल्याशिवाय पुढे जात येत नाही आणि वर जाण्यासाठी रस्ता ठीक आहे कि नाही हे हि इथेच समजत.
आम्हाला इथे मिळणारा हलका फुलका हिम वर्षाव, वर जोरात चालू होता आणि त्यामुळे या पोस्ट वरून पुढे दुचाकीना वर जायला बंदी केली होती.
आली का पंचाईत. तिथल्या ऑफिसर च्या म्हणण्या नुसार वर सायकल चालण्या योग्य परिस्थिती नाही , बरं बर्फ पडतच होतं ,
शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे थंडी वाजायला लागली होती . आता काय करावे. चार चाकी गाड्या जाऊ देत होते. शेवटी सायकल गाडीत चढवली आणि पुढे निघालो,
मनात विचार हा, कि पुढे जाऊन सायकल परत बाहेर काढू आणि चालवायला लागू ,
पण पुढच्या रस्त्याचं एकंदर स्वरूप बघता आणि ३ किमी नंतर सुरु झालेला खराब रास्ता , त्यावर तयार झालेली चिखल पाण्याची तळी , पडणारं बर्फ आणि ट्राफिक जॅम पाहून लक्षात आलं कि आपली सायकल राईड इथेच संपलीय.

गाडीत बसून चारी बाजूनी वेढलेली हिमाच्छादित शिखरं , भिंती , बर्फाच पाणी झिरपून तयार झालेल्या तुळया न्याहाळताना विचार करत होते कि काय साध्य केलं मी?
एकंदर २२ किमी चा संपूर्ण चढाईचा अति उंच हवामानात केलेला पहिला सायकल प्रवास आणि या प्रवासात गाठलेली ४००० फूट हे माझ्यासाठी माझं यश होतं , त्याचबरोबर अनेक शारीरिक , मानसिक , आर्थिक ताणातून स्वतःला वर खेचून मी काहीतरी माझ्या आवडीचं , कस पाहणार धाडस मी ८० टक्के का होईना पूर्ण करू शकले होते. बरं ते करताना आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद हि घेतला होता , आनंद घेतला होता , नुसतं दम काढत झापड लावून किलोमीटर च्या किलोमीटर पार करत एखाद्या इच्छित ठिकाणी पोचणं यापेक्षा त्या प्रवासाचा मजा लुटता येण हे अधिक भावतं मला ते मी करू शकले.
अजून मी आशा सोडलेली नाही , उलट या अनुभवानंतर माझा आत्मविश्वास अजूनच वाढलाय.
खारडुंग ला पूर्ण करणार , नवे रस्ते शोधणार , सायकल सखीशी अजून मैत्री वाढवणार हे नक्की .
चढ आला कि माझ्या उजव्या गुडघ्यात किंचित कळ यायची मग परळला माझ्या गुडघ्याचे डॉक्टर , डॉ अनंत जोशी ना दाखवून यायचं ठरवलं , त्यांनी हिरवा कंदील दिला आणि खाली असलेल्या फिजिओ सेंटर मधून आखडलेला खांदा आणि गुडघे यांच्या साठी व्यायाम शिकून घ्यायला सांगितले. अद्ययावत अश्या जिम मध्ये थेरपिस्ट नी मला व्यायाम दाखवले .
आता हे करायचे कुठे , माझी जिम सीबीडी ला मी दादरला , शेवटी सायकलवर टांग मारून परळ गाठणे आणि डॉक्टरांच्या सेंटर मध्ये दर सेशन चे पैसे देऊन व्यायाम करणे असा मार्ग मी शोधला ,
वाढलेलं वजन कमी झालं तर मला निश्चितच फायदा झाला असता पण या दादर सीबीडी आणि एकूणच अव्यवस्थापनाने आहारावर अजिबात शिस्त लावता येईना.
एकीकडे घराचं काम मनासारखं वेळेवर होत नसल्याची निराशा आणि दुसरीकडे त्या निराशेवर मात करण्याची तडफड असे दिवस चालले होते . ज्या वस्तू , कपडे लडाख ला न्यायच्या त्या अजूनही धुळीच्या ढिगाऱ्यात पडून होत्या .कामगार मंडळी विशेषतः सुतार काम संपवत नाहीत तो पर्यंत इतर कामं पुढे सरकेनात.
मी दिलेली डेड लाईन कधीच सरली आणि सरते शेवटी साडेचार महिन्यांनी ७, ८ जून ला घर माझ्या ताब्यात आलं , त्यानंतर साफ सफाई करून सामान साधारणपणे लावण्यात ३ दिवस गेले. सीबीडी त असलेलं माझं थेरपी सेंटर सुरु केलं.
घर पूर्ण झाल्यावर लडाख ला जाण्याआधी एक गाण्याचा कार्यक्रम ठेवावा असा नीलचा धोशा चालू होता , त्याला थोपवून धरला होता कारण मनासारखं घर लागेपर्यंत आणि जाण्याच्या तयारीचा अंदाज येई पर्यंत काही खरं नव्हतं . शेवटी १६ तारखेला कार्यक्रम निश्चित केला, १८ ला नील चा वाढदिवस आणि १९ मध्यरात्री आमची फ्लाईट .
खरं म्हणजे लडाख ची तयारी , सराव राहिला बाजूला आणि या कार्यक्रमाच्या खान पान, बैठक , घरातील शेवटच्या लावायच्या राहिलेल्या वस्तू यातच १६ चा दिवस जायचा पण मी सीबीडी ला आल्या पासून नेटाने खारघर हिल वर सायकलिंग सुरु केले होते, हा चढ सलग ५ कि मी चा आहे , पहिल्या दिवशी १ लूप .दुसऱ्या दिवशी २ आणि १६ तारखेला पहाटे या रूट चे ३ लूप मी करून आले ,
आत्ता पर्यंत च्या सरावात सर्वात जास्त अंतर चढ मी चढले . हे अजिबात पुरेसं नाही कारण हिमालयात अति उंची मुळे प्राणवायू ची कमतरता जाणवणार असते , आणि खारडुंग ला चा चढ ४० किमी होता , कशी करणार होते मी उद्दिष्ट पूर्ण?
१७ , १८, १९ एक हि दिवस सराव होऊ शकला नाही.
त्यातल्या त्यात मनाला आनंद देणाऱ्या काही गोष्टी म्हणजे घर सुंदर दिसायला लागलं होतं .

१६ तारखेचा गाण्याचा कार्यक्रम उत्तम झाला.
१८ ला जेंव्हा सीबीडी ला घरी परतलो तेंव्हा कुठे सामानाची जुळवाजुळव सुरु केली . गरम कपडे , प्रवासाचे कपडे , सायकलिंग चे सामान आणि कपडे , पौष्टिक पदार्थ , पेय , ट्रेकिंग करता आले तर असावेत म्हणून ट्रेकिंग पोल अशी शेवट पर्यंत तयारी आटोपून १९ ला संध्याकाळी दादर ला आलो .
ताईच्या दर वर्षीच्या भारत ट्रिप मध्ये या वर्षी ची ट्रिप आमच्या दोघींसाठी फारच ताण पूर्ण ठरली , सीबीडीतून अचानक दादरला राहायला आल्यावर सर्वांची तंत्र जमवून आणणे ,स्वयंपाकाला बाई नसल्यामुळे त्या जबाबदाऱ्या पार पडणे , माझ्या मानसिक ताणामुळे होणारी चिडचिड या सगळ्याने माझ्या आणि ताईच्या संवादाचा नुसता राडा झाला होता. मग १९ ला रात्री निवांत गप्पा मारून, मन शांत करून तिच्या हातचे चविष्ट जेवून आम्ही लेहला जायला निघालो.
हुश्श , विमान वेळेवर सुटलं. सूर्योदयाची दिशा डोक्यात ठेवून विमानाच्या डाव्या बाजूच्या सीट मिळवल्या होत्या. पहाटे ४.३० च फ्लाईट होतं तेंव्हा लेहला पोचताना सूर्योदय झालेला असणार आणि बर्फाच्छादित डोंगर जर पाहायचे असतील सूर्याची दिशा समोर असून चालणार नव्हतं . अपेक्षेप्रमाणे आधी हिरवे उंचवटे मग बर्फाच्या टोप्या , त्यानंतर पूर्ण बर्फाळलेले डोंगर आणि शेवटी मुरुमी रंगाच्या बोडक्या डोंगर रांगा अशी नजरेचे पारणे फेडणारी दृश्य बघत विमानाने एकदम एक पाचूचे बेट दाखवलं . त्यात उमटलेली एक लांब रेघ. धाव पट्टी ? हेच आहे का लेह? म्हणता म्हणता आम्ही पुढे गेलो आणि मोठा वळसा घालून त्या रेघेवर येऊन जमीनस्थित झालो.

लेह ११५०० फुटांवर आहे. समुद्रसपाटीपासून निघून आपण एकदम एवढ्या उंचीवर आलो कि शरीराला हवेच्या कमी दाबामुळे त्रास होऊ शकतो . इथे तुलनेने ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे सर्व डॉक्टर आणि ट्रेकर मंडळीनी डायमॉक्स च्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता तो आम्ही पाळलाही होता . लेहला पोचल्यावर पहिले दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्यायची होती , वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी. मुख्य शहरापासून दूर छूबी मध्ये आमचं हॉटेल होतं .
दुसऱ्या दिवशी थोडं चालत फिरून सायकलींगशी निगडित ,आणि इतर काही मंडळींची भेट घेतली , बाजाराची ओळख करून घेतली. दर महिन्यात १५ दिवस लडाख मध्ये येणाऱ्या एका मित्राची सायकल मिळवली आणि २२ तारखेला माझी पहिली शांतीस्तुपाची पहिली राईड केली.
छुबी पासून साधारण चार एक किलोमीटर अंतरावर असलेला शांती स्तूप पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे . पण मी खूप पहाटे पोचले असल्याने एक दोन मॉर्निंग वॉकर्स व्यतिरिक्त तिथे कोणी नव्हतं .
लेह मध्ये मला काही मराठी धाडसी उद्योजक मंडळी भेटली त्यातली एक तन्वी . सायकलिंग , ट्रेकिंग च्या निमित्ताने लेह च्या वाऱ्या करणारी तन्वी लेह च्या प्रेमात पडली . आयुष्यभर टिपिकल नोकरी करायची नाही हे पक्के ठरवलं होतं . विशिष्ट प्रकारच्या कॉफीज् बनवायची कला शिकून घेत तिने इथे चक्क मेटा कॅफे नावाचा एक कॅफे थाटला आणि आता वर्षभरातच त्यानी छान बाळसं ही धरलं आहे.
हिच्या कॅफेतून बाहेर पडताना एक वेगळंच संकट उभं राहिलं . माझ्या एका पावलानी अचानक एक पायरी उतरायला नकार दिला आणि अख्ख पाऊल मागच्या बाजूला मुडपलं. असह्य कळ गेली आणि पाऊल घोट्याजवळ समोरच्या बाजूनी सुजायला लागलं . आधीच फिटनेसच्या नावानी बोंब आणि त्यात हा उद्योग. त्यातल्यात्यात, आपल्याला चालायचे नाही सायकलिंग करायचे आहे त्यामुळे नाही काही त्रास होणार हे मनाला समजावलं आणि तिथून निघाले.तर या तन्वी शी गप्पा मारून, रोव्हर्स डेन या बॅक पॅकर्स लॉज प्रकारच्या सेट अप चे मालक ग्रीष्मा आणि कौस्तुभ शी बोलून मी माझी सायकलिंग राईड ची शारीरिक , मानसिक तयारी केली , हि मंडळी बॅक अप वेहिकल नकोच म्हणत होती पण माझ्या दृष्टीने ते आवश्यक वाटत होतं , आणि घेतला तो निर्णय योग्यच ठरला .