सुरुवात करायची तर .....
गंगटोक जवळच्या एका wild life sanctuary मधून पक्षी निरीक्षण करत चाललेला आमचा प्रवास . दोन्ही बाजूनी उंचच उंच वृक्षांमधून कोरलेला नागमोडी रस्ता . प्रत्येक सहकार्याकडे त्याच्या कुवती नुसार ची कॅमेऱ्याची तोफ...
काही चाहूल जाणवते म्हणून सर्वजण गाडीतून पायउतार होत रस्त्याच्या बाजूची झाडी नजेरेने पिंजून काढत असताना जाणवते एक हालचाल .. पक्ष्याची नही तर पायवाटेने वर रस्त्यावर चालत आलेल्या शाळेचा गणवेश घातलेल्या २ गोंडस भावंडांची हातात हात घालून चालत असलेली जोडगोळी.
माझी नजर त्यांच्या वर जाते आश्चर्याच्या सगळ्या छटा माझ्या चेहऱ्यावर उमटतात आणि चटकन कॅमेरा त्यांच्यावर रोखला जातो, क्लिकक्लिकाट ऐकून इतरांना ही स्फूर्ती चढते आणि मग त्या गोड चिमण्यांवर आम्ही क्लिक्स चा आणि त्याचबरोबर लाडाचा पाउस पडतो. परत पक्ष्याचा किलबिलाट आमचा फोकस खेचून घेतो आणि कॅमेऱ्याचा नेम परत जंगलभिंती वर धरतो.



मस्तच लिहीलं आहेस जुई.....keep it up.....! ☺
ReplyDeleteमस्तच लिहीलं आहेस जुई.....keep it up.....! ☺
ReplyDeleteवाह छान लीहीलय!
ReplyDeleteछान.
ReplyDeleteMasta... Waiting for next blog
ReplyDeleteछान!
ReplyDeleteछान!
ReplyDeleteखूपच छान लिहिलयेस जुई , लिहित रहा ।
ReplyDeleteखूपच छान लिहिलयेस जुई , लिहित रहा ।
ReplyDelete