अधुरी एक कहाणी
22 जानेवारीला एका चेन्नई हून आलेल्या फोटोग्राफर मैत्रिणी बरोबर फिरताना व्हॅली पार्क च्या गेट च्या अलीकडे मोकळ्या बुंध्यावर बसलेली ब्राह्मणी घार बघितली .
आकाशात बरेचदा पाहिली पण इथल्या जंगलात खाली बसलेली आधी पाहिल्याचं आठवत नव्हतं, आनंद झाला.
सेक्टर मध्ये नव्यानेच पक्षीनिरीक्षण करायला लागलेल्या एका व्यक्तीने तिच्या बनू लागलेल्या घरट्याचा व्हिडीओ काढला आणि मी अजूनच खूष झाले .
एकदा घरट्याची जागा पाहून ठेवली ,
पार्कच्या नियमित फेऱ्यांमध्ये जोडीचे कसे न कसे दर्शन होत राही आणि कावळे त्यांच्या इथल्या वास्तव्याला कडाडून विरोध करतायत हे ही जाणवे.
घारीच्या हालचाली सुरू झाल्या की
अतिशय चिवटपणे त्यांचा पाठलाग आणि कावकाव चाले .
जिथून घरटे दिसू शकते ती जागा रस्त्याच्या आतल्या बाजूला होती पण एकदा त्यांच्या घरट्याची प्रगती होतेय हे लक्षात आल्यावर मी आणि ती व्यक्ती तिथे फिरकेनासे झालो .
फक्त लांबूनच मोकळ्या बुंध्यावर बसलेल्या घारीशी गप्पा मारायच्या , ' काय ग सगुणे बरी आहेस ना , चालू आहे डागडुजी , घातली का अंडी ? '
मार्च मध्ये सुरू झालेल्या Lockdown च्या सुरुवातीला पार्क च्या आत जपत असलेला पाण्याचा साठा सुरळीत ठेवणं कठीण होऊ लागलं, तिथे पाणी फार साठवता येत नाही आणि मग उघड्यावरील जागा असल्याने एकतर उन्हाने पाणी सुकून जाई नाहीतर गुरं एका मिनिटात संपवून टाकत , तसा ही हा याच वर्षी चालू केलेला उपक्रम होता , पक्ष्यांना फार सवय नव्हतीच मग फक्त पार्कमधल्या वॉटर पॉटस मध्ये पाणी घालत राहिले , नंतर नियम जास्त कडक झाले आणि मलाही गेट मध्ये एन्ट्री बंद झाली , वॉचमन आणि पाणी खात्याच्या माणसांनी ती जबाबदारी उचलायचं कबूल केलं .
आता मी जंगलात जाण्यासाठी माझे नवीन मार्ग शोधले , कुणाचा ही संपर्क न येता भटकंती करता येईल , पक्षीनिरीक्षण करता येईल अशी वाट मी आणि नील नी शोधून काढली.
ही वाट ब्राह्मिणी घारीच्या घरट्याजवळ जात होती , तसे ही आता 2 महिने झाले होते , घारी दिसत तर होत्या , म्हणजे पिल्लं बाहेर आली असावीत.
एकदा वाटेवर पोचले आणि चक्क दोन्ही घारी घरट्यावर बसून पिल्लाला खाऊ घालताना बघायला मिळाल्या होत्या .
परवा नील आणि मी त्या स्पॉट ला निरीक्षण करत बसून राहायचं ठरवलं .
आधी काही हालचाल दिसली नाही मग मात्र घरट्यातले पिल्लू हालचाल करताना दिसले , कॅमेऱ्याला उत्तम झूम असल्याने ती हालचाल टिपता ही आली.
तेवढयात एक घार आली आणि तिने कसे कोणास ठाऊक आम्हाला पाहिले आमच्या डोक्यावरून घिरट्या घालू लागली मग मी ही हळूहळू गप्पा मारायला लागले तिच्याशी , ' सगुणे , घाबरू नको , काही करत नाही आम्ही तुला , जाऊ थोड्या वेळाने !'
ती मग तिच्या पसंतीच्या बुंध्यावर जाऊन तिथून आम्हाला न्याहाळू लागली , मी शांतपणे घरट्याचे निरीक्षण करत बसले , नंतर दुसरी घार पण येताना दिसली पण दोघी ही इथे तिथे करत राहिल्या , घरट्यावर काही आल्या नाहीत .
वीसेक मिनिटे थांबून मी आणि नील तिथून उठलो.
घरट्याचे निरीक्षण एवढा एकाच अजेंडा ठेवून मी काल परत आत गेले , स्पॉटवर पोचले आणि जास्त इथे तिथे न करता गपचूप बसून राहिले , घरट्यात पाहिलं पण हालचाल जाणवली नाही . तशीही आई बाबांची चाहूल लागली की पिल्लं हालचाल करतात अस वाटतं. मग अर्धा पाऊण तास तिथेच बसून वाट पाहिली , अहं, काही नाही तेंव्हा नाद सोडून रस्त्यावर च्या पॉट पाशी काही दिसत का बघावं म्हणून निघाले .
ही वाट घरट्याच्या झाडाखालूनच जाते .
आधी एक चकोत्री च कुटुंब चरत जाताना दिसलं ते बघत उभी राहिले , त्या निघून गेल्यावर पाय पुढे टाकला आणि समोरचं दृश्य बघून थरकाप उडाला , जमिनीवरच्या पाळापाचोळ्यावर माझी सगुणा आपले दोन्ही पंख पसरून , मान मागे आणि बंद डोळे आणि चोच आभाळाकडे, पाय जमिनीवर रोवलेल्या अवस्थेत निपचित पडलेली होती. तिच्या पंखांवरून असंख्य पिसवा धावत होत्या. चोचीतून किंचित चिकटावा लोंबत होता.
काही क्षण मी हतबुद्ध होऊन बघत राहिले , काहीच सुचेना , मग एखादया प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे अंग थरथरू लागले , उमाळा येऊ लागला .
मनाला आवरलं , आणि हे कशामुळे झालं असावं हे समजून घेण्यासाठी काठीने तिला किंचित उचलून जखम, रक्त काही दिसत का ते पाहिलं पण अपघाताची कसलीच खूण मला तरी दिसली नाही .
तिथे अधिक थांबवेना .
एका फुलत चाललेल्या संसाराचा अनपेक्षित अंत झाला होता.
एक कहाणी अधुरीच राहिली
😒

No comments:
Post a Comment